Type to search

Featured जळगाव

भुसावळ : ट्रक मोटरसायकलची समोरासमोर धडक ; एकचा मृत्यू दुसरा गंभीर

Share

भुसावळ

येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील धनश्री गॅस एजन्सी समोर ट्रक  क्र.एमएच १९ झेड ९६३९ व  विना क्रमांकाची केटीएम कंपनीची मोटरसायकलची समोरासमोर धडक झाल्याने झालेल्या अपघातात हर्षल संतोष सपकाळे (वय ३०, श्रीनगर, भुसावळ) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर चेतन भरत चौधरी (वय २७, रा.श्रीनगर, भुसावळ) गंभीर झाल्याची घटना दि.२२ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली.

या अपघातामुळे महमार्गावर काही काळ वातकुकीचा खोळंबा झाला होता. घटनेची माहिती समजताच डिवायएसपी गजानन राठोड यांच्यासह बाजारपेठ पोलिस स्टेशनचे कर्मचारी तसेच माजी नगरसेवक दीपक धांडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष नितीन धांडे, नगरसेवक पिंटु ठाकुर, दुर्गेश ठाकुर, सतीश सपकाळे यांच्यासह नागरिकांनी महामार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली.

या अपघातमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती. वाहतुक शाखेचे एपीआय के.टी.सुरळकर यांच्यासह कर्मचार्‍यांनी घटनास्थळी दाखल होत वाहतुक सुरळीत केली.  दरम्यान ट्रक चालक ललित कोळी यास ट्रकसह पोलिसांनी ताब्यात घेतले.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!