ब्राझीलची राजधानी रिओ दी जेनेरो येथे आगीत होरपळून दहा जणांचा मृत्यू

0

रिओ दी जेनेरो : ब्राझील फुटबॉल क्लब फ्लामेंगोशी संबंधित यूथ टीमच्या हेड क्वाटरमध्ये शुक्रवारी सकाळच्या सुमारास आग लागली. यात किमान १० खेळाडूंचा जळून मृत्यू झाल्याचे समजते. ब्राझीलची राजधानी रिओ दि जानेरो येथे ही घटना घडली आहे.

या घटनेत इतर तीन जण जखमी झाले आहेत. यापैकी दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे, अशी माहिती अग्निशामक दलाने दिली दलाने दिली आहे.

ही घटना रिओ दि जेनेरो येथील फ्लेमिंगो फुटबॉल क्लबच्या निन्हो दे उरुबु प्रशिक्षण मैदानात घडली. ही आग स्थानिक वेळेनुसार, सकाळी पाच वाजून १० मिनिटांनी लागली. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जवळपास दोन तास एवढा वेळ लागले.

प्लेमिंगों यूथ टीमच्या हेड क्वाटरमध्ये, ही आग कशी लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ज्या प्रशिक्षण केंद्रात ही आग लागली ते केवळ दोन महिन्यांपूर्वीच तयार करण्यात आलेले आहे. घटनेतील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*