वणीत चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री चार दुकाने फोडली

0
वणी (राजेंद्र भाटी) l वणीत मध्यरात्री चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला. शहरातील चार वेगवेगळ्या दुकानांतून लाखोंचा मुद्देमाल लुटून नेला.

यात खाबिया किराणा स्टोअर्स, बाविस्कर ज्वेलर्स, पुष्पावती अलंकार व देशी दारु दुकानाचा समावेश आहे. मध्यरात्रीच्या सुमारास शटर वरती करून या चोऱ्या झाल्या.

या प्रकारामुळे शहरातील नागरिकांसह व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण असून पोलिसांनी लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

 

LEAVE A REPLY

*