नांदूरमध्यमेश्वरजवळ बीपीसीएल कंपनीची डिझेलवाहिनी फुटली; बोअर केल्याचा संशय

0

निफाड ता. ७ : मुंबईहून मनमाडला नेण्यात आलेली बीपीसीएल कंपनीची भूमिगत डिझेलवाहिनी खानगाव धाडी गावाजवळ फूटुन लाखो हजारो लिटर डिझेल नदीपात्रात वाया गेले.

जमिनीखाली दहाफूट खोल असलेली ही वाहिनी अज्ञात चोरट्यांनी बोअरच्या साह्याने फोडली असावी असा संशय व्यक्त होत आहे.

काल रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. बीपीसीएल कंपनीचे अधिकारी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून या ठिकाणी कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

नांदुरमध्यमेश्वरजवळील नदीपात्रापासून जवळ असलेल्या गायरान जमिनीखालून ही वाहिनी नेण्यात आलेली आहे. दहा फूट खोल अंतरावर असलेली ही वाहिनी अतिशय मजबूत लोखंडापासून तयार करण्यात येते. त्यामुळे बोअर केल्याशिवाय ती फोडणे शक्य नसल्याचे सांगण्यात येत आहे.

मनमाडच्या पानेवाडी येथील पेट्रोलियम गोडाऊनला ही वाहिनी जोडण्यात आलेली आहे. या वाहिनीच्या रक्षणासाठी दर तीन किलोमीटर अंतरावर एक सुरक्षारक्षक चौकीची नियुक्ती असते.

LEAVE A REPLY

*