‘सीएसआर’ नव्हे ही तर आहे ‘स्वावलंबन चळवळ’

बॉश करणार 45 गावांचा लोकसहभागातून सर्वांगिण विकास

0
नाशिक | शासनाच्या आदेशानुसार उद्योगाच्या नफ्यातील 2 टक्के रक्कम खर्च केली म्हणजे सामाजिक बांधिलकी झाली असे न करता बॉश लि. कंपनीने वैतरणा नदी काठच्या 45 गावांचा लोकसहभागातून सर्वांगिण विकास करण्यासाठी विशेष चळवळ हाती घेत नवा आदर्श गडवण्याचा प्रयत्न सूरू केलेला आहे.

त्र्यंबेश्वर ते घोटी दरम्यानच्या वैतरणा नदी काठच्या 45 आदीवासी भागातील गावांचा विकास करण्याचा संकल्प बॉश टीमने केला होता. त्या पार्श्वभूमीवर या भागाचा अभ्यास अगोदर करण्यात आला. या भागातील लोकांना स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण व कौशल्य विकास या गोष्यींकडे जास्त लक्ष देण्यावर भर देण्यात आला.

परिसरातील पाण्याच्या प्रश्नावर असलेल्या आठ धरणांची कोल्हापूर पध्दतीने दुरूस्ती करुन पाणी साठवणीत वाढ करण्यात आली. 4 ते 5 शाळांच्यां दूरूस्तीसह इमारत बांधण्यात मदत करण्यात आली. या कामातही श्रमदान अथवा अंगकामासाठी लोकसहभाग घेण्यात आला. लोकांनी गावच्या विकासासाठी श्रमदान केल्यानंतर त्या कामाच्या जपणूकीचे मुल्या निश्चितच वाढत असल्याने त्यांना सहभागी करण्यात आले.
प्रत्येक गावाच्या समस्या वेगवेगळ्या होत्या. त्यांचा अगोदर सर्व्हेक्षण करुन शासनाद्वारे रितसर परवानगी घेऊन विकास कामांना आकार देण्यात आला. कंपनीने देशातील विविध महाविद्यालयातून सोशल इंजिनिअरींग विभागाच्या पदव्यत्तर पदवीका घेतलेल्या 10 मुलांची या प्रकल्पावर विशेष प्रतिनिधीम्हणून नियुक्ती केली. त्यांच्या माध्यमातून गावागावात जाऊन नागरीकांशी संवाद साधण्यासोबतच त्यांना कामात प्रोत्साहीत करण्याची जबाबदारी देण्यात आली. या माध्यमातून या गावांतील 17 मुलांना एकत्र करुन कादी व ग्रामोद्योग येथे टेलरींगचे शिक्षण देण्यात आले. आज या मुली स्वावलंबी झाल्या असुन गावागावात टेलरींगचे काम करुन उपजिवीका करण्यास सक्षम झालेल्या आहेत.
हरिहर गड परिसरात पर्यटकांद्वारे केल्या जाणार्‍या कचर्‍यातून मुक्ततेसाठी कोटमवाडी ग्रामस्तांच्या मागणीवरुन गावात डस्टबीन देण्यात आले. आज हे गाव स्वच्छ गाव म्हणून पूढे आले आहे. कंपनीच्या प्लंबींगच्या मदती व्यतिरिक्त ग्रामस्थांच्या श्रमदानातून पाईपलाईनचे काम पूर्ण करण्यात आले.या 45 गावांतीरल किशोर वयीन मुलींना परस्परांशी मोकळा संवाद साधण्यासाठी प्रात्साहीत करुन त्यांना स्वावलंबनाचे धडे देण्यात आले. पोलिस पाटलाची भूमिका, सामाजीकरण , सरकारच्या योजना याबाबत प्रबोधनही करण्यात आले.
आंबोली गावात मोठ्या प्रमाणात गभ्रवती महिलांच्या मृत्यूचे प्रमाण होते. ही बाब सर्व्हेक्षणात लक्षात आल्या नंतर जानेवारी महिन्यापासून यावर काम करण्यास सूरूवात केलेली आहे.
बॉशची वैद्यकिय टीम, अधिकार्‍यांचे कुटूंबीययांच्या सहभागातून जनजागृती मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. टाटा कन्स्लटन्सीतून याबाबत माहीती गेण्यात आलेली आहे. आशावर्कर्सची नियुक्ती व विकास करुन महिलांना प्रबोधन केले जात आहे. यातून निश्चित गर्भवती मातांना प्रबोधन करुन त्यांचे मृत्यू रोकण्यात यश मिळेल असा विश्वास अधिकारी व्यक्त करीत आहेत.
बेस्ट प्रॅक्टीस नोंदीची शिफारस : राज्याचे मुख्य सचिव व बंधारे क्षेत्राची विशेष आवड असलेल्या स्वाधिन क्षत्रिय यांनी या गावांतील बंधारा दूरूस्ती कामाची पाहणी केली. कामाचा दर्जा व गती पाहून त्यांनी समाधान व्यक्त करतानाच राज्याच्या यादीत ‘बेस्ट प्रॅक्टीस’ म्हणून नोंदविण्यासाठी पाठवण्याची अधिकार्‍यांना शिफारसही केली.

LEAVE A REPLY

*