Friday, May 3, 2024
Homeधुळेबोराडीतील भोंगर्‍या बाजाराची उत्साहात सांगता

बोराडीतील भोंगर्‍या बाजाराची उत्साहात सांगता

बोराडी । Boradi । वार्ताहर

शिरपूर तालुक्यातील बोराडी येथे आदिवासी बांधवांच्या (tribal brothers) संस्कृतीचे (culture) दर्शन घडवून देणारा भोंगर्‍या बाजाराचा (Bhongarya Bazaar) अतिशय उत्सवात समारोप झाला. या भोंगर्‍या बाजारात सुमारे 35 ते 40 लाखाची उलाढाल झाली.

- Advertisement -

होळी (Holi) हा आदिवासींचा (tribals) महत्वाचा सण असून आदिवासी आपला पारंपारिक असा होळी सणासाठी तिरकामठा, बुधे, भोपळे घुंगरू डफ, मोठे ढोल, बाडे, झांज, बासरी आदि साहित्याची जमवा-जमव करतांना दिसून येतात. मोठ्या उत्साहात आज बोराडी गावाची होळी साजरी झाली. कोरोनाच्या (Corona) महामारीमुळे दोन वर्षापासून भोंगर्‍या बाजार (Bhongarya Bazaar) बंद करण्यात आला होता. यंदा कोरोनाला हद्दपार करुन मोठ्या उत्साहात भोंगर्‍या बाजार साजरा करण्यात आला. या भोंगर्‍या बाजाराला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे यांनी हजेरी लाऊन पूर्ण भोंगर्‍या बाजाराची माहिती घेतली.

बोराडी येथील भोंगर्‍या बाजाराचा यंदा पहिला मान कोडीद व उमर्दा गावाचा होता. येथील बोराडीचे उपसरपंच राहुल रंधे यांच्या हस्ते मानाच्या ढोलचे पूजन (Worship of Mana’s drum) शिवाजी चौकात करण्यात आले.

या प्रसंगी डॉ.तुषार रंधे, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष राहुल रंधे, ग.स.बँकेचे माजी चेअरमन निशांत रंधे, रमन पावरा, विशाल पावरा, डोगरसिंग पावरा, कालूसिंग पावरा, कोडीदचे पोलीस पाटील भरत पावरा, डॉ. हिरा पावरा, कांतिलाल पावरा, शब्बीर पावरा, रवी वसावे, शिवल्या वसावे, जगन टेलर, शामकांत पाटील, भागवत पवार, प्रमोद पवार, संजय जगदेव,सुनील पावरा, नागेश पावरा, दिलीप पावरा, संभू पावरा, मगन पावरा, सुनील पावरा, कावा पावरा, डॉ. हिमत पावरा, संतोष पावरा, हरी पावरा, बाबूलाल पावरा, संजय पावरा, देवसिंग पावरा, रविंद्र पावरा, दिलीप वसावे, साहेबराव पावरा, हरी पावरा बाबूलाल पावरा, व कोडीद बुडकी, नवागाव, उमर्दा, वकवाड, मालकातर, धाबापाडा, न्यू बोराडी, आदी परिसरातील पोलीस पाटील, सरपंच उपस्थित होते.

या उत्सवासाठी मध्यप्रदेशातील व परिसरातील, 60 ते 70 गावातील आदिवासी (tribals) लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामुळे सांगवी रस्ता ते पानसेमल रस्ता व शिरपूर रस्त्यावर एक किमी. पर्यंत व्यावसायाची दुकाने (Shops) थाटण्यात आले होते. तसेच ज्या त्या गावातील प्रमुख आपल्या बरोबर ढोल वाजंत्री (काश्याचे भांडे) सह बोराडी येथे वाजत गाजत नृत्य (Dance) करीत आल्याने या बाजाराला महत्व प्राप्त झाले. गुलाल्या बाजार (Gulalya Bazaar) भोंगर्‍या बाजार हा स्वतंत्र पणे चालणार्‍या या उत्सवाची सांगता होते न होते तोच होळी उत्सवाला प्रारंभ झाला.

या बाजारात विविध व्यावसायीकांसह भोपळे घुंगरू, डफ, ढोल, बाजे, झांज, बांसरी आदि साहित्य विक्रीसाठी उपलब्ध होते. तसेच विविध प्रकारचे आभुषणे, दैनदिन जिवनात उपयोगी ठरणारी मातीची भांडी यांच्यासह खाद्य पदार्थही उपलब्ध होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या