Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

RTO कार्यालयाच्या संरक्षक भिंतीलगत आढळला हाडाचा सापळा; परिसरात खळबळ

Share

पंचवटी | वार्ताहर

आरटीओ कार्यालयाच्या संरक्षक भिंतीलगत हाडांचे सापळे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलीस यंत्रणा दाखल झाली असून तपास सुरु असल्याची माहिती प्रतिनिधीकडून प्राप्त होत आहे.

पेठरोडवर आरटीओ कार्यालय आहे. या परिसरात म्हसरूळ पोलीस ठाण्याची भिंत आणि आरटीओ यामध्ये मोठी मोकळी जागा आहे. दगडी भिंत तोडलेली असून याठिकाणी मानवी सापळा आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

यामध्ये डोक्याची कवटी, दोन पायांचे भाग विविध ठिकाणी सापडले आहेत. हा अज्ञात पुरुषाचा मृतदेह असल्याची शक्यता वर्तवली जात असून भटक्या कुत्र्यांनी मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची शक्यता आहे.

घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. तपास सुरु असून अद्याप कुठलीही अधिकृत माहिती पोलीस सूत्रांकडून प्राप्त झालेली नाही.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!