मुंबई उच्च न्यायालयाने ‘दहीहंडी’ वरील सर्व निर्बंध हटवले

'दहीहंडी'ची उंची सरकारने ठरवावी- मुंबई उच्च न्यायालय

0

मुंबई : आज मुंबई उच्च न्यायालयाने दहीहंडी वरील सर्व निर्बध हटवले आहेत.

आता दहीहंडी बाबत सर्व नियम ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारला असणार आहे.  

तसेच,14 वर्षांखालील बाल गोपालांचा दहीहंडीत समावेश होणार नाही, याची काळजी घेऊ, असे आश्वासन राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयास दिले.

हायकोर्टाच्या या निकालाने गोविंदा पथक आणि आयोजकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

गोविंदांना हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, चेस्ट गार्ड तसेच सगळ्यांच्या नावांची नोंद ठेवणे अनिवार्य  करण्याचे दहीहंडी आयोजकांना राज्य सरकारने दिली आहे.

 

 

 

LEAVE A REPLY

*