Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या

मराठा समाजाला आरक्षण मिळाले; सर्वत्र आनंदोत्सव

Share

अखेर न्यायालयाने मराठा आरक्षणा वैध ठरवले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने आज महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाबाबत निर्णय दिला.

मुंबई हायकोर्टाच्या आजच्या निकालाकडे मराठा समाजासह सर्वांचेच लक्ष लागून होते. न्यायाधीश रणजित मोरे व न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी आज यावर निर्णय दिला आहे.

राज्य सरकारला आरक्षण देण्यास अधिकार आहे. 102 व्या घटनादुरूस्तीनुसार राज्य सरकार आरक्षण देऊ शकते. मराठा समाज मागास असल्याचे यात सांगण्यात आले आहे.  न्यायालयाने आरक्षण वैध ठरवले असून नोकरी आणि  शिक्षणामध्ये आरक्षण कायम ठेवले जाणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या  निर्णयानंतर कोर्ट परिसरासह राज्यात मराठा समाजाने आनंदोत्सव साजरा केला.

मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार मराठा आरक्षण  वैध असले तरी टक्केवारी 16% ऐवजी 12-13% होण्याची शक्यता वर्तविली जाते आहे. राज्य सरकार याबाबत लवकरच निर्णय देणार असल्याचे समजते.

मुंबई उच्च न्यायालयात आरक्षणाचा समर्थनार्थ 2 तर विरोधात 4 याचिका आल्या होत्या. त्यावर आज अंतिम निकाल घेण्यात आला. मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या जनहित याचिका जयश्री पाटील, संजीत शुक्ला, उदय भोपळे यांच्यासह काहींनी केल्या, तर वैभव कदम, अजिनाथ कदम, अखिल भारतीय मराठा महासंघ यांच्यासह अनेकांनी कायद्याच्या समर्थनार्थ याचिका केल्या होत्या.

मराठा समाजाने मागील 3 वर्षामध्ये सुमारे 48 मोर्चे काढून या आरक्षणासाठी मागणी तीव्र केली होती. महाराष्ट्रात डिसेंबर 2018 मध्ये सरकारने 16% आरक्षण जाहीर केले होते. त्यानुसार नोकरी आणि शिक्षणामध्ये मराठा समाजाच्या लोकांना आरक्षण देण्यात आले होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!