बॉलिवूडची पहिली सुपरस्टार अभिनेत्री श्रीदेवी काळाच्या पडद्याआड

0

दुबई, ता.25। गेली अनेक वर्षे आपल्या अदाकारी आणि सौन्दर्याने प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या आणि बॉलिवूडची पहिली सुपरस्टार अभिनेत्री म्हणून किताब मिळविणाऱ्या पद्म पुरस्कार सन्मानित अभिनेत्री श्रीदेवी कपूर यांचे आज पहाटे हृदयविकाराने दुबईत निधन झाले.

त्या 54 वर्षांच्या होत्या. येथील एका लग्नसमारंभात भाग घेण्यासाठी त्या आल्या होत्या. त्यांच्या पश्चात पती निर्णय बोनी कपूर आणि 2 मुली असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने चित्रपट जगतावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनसमयी त्यांची मोठी मुलगी जान्हवी मुंबईत होती. त्यांचे पार्थिव आज दुपारच्या सुमारास मुंबईत आणण्यात येणार आहे.

श्रीदेवी भारतासोबतच पाकिस्तानमध्येही लोकप्रिय होत्या. त्यांनी आतापर्यंत 5 फिल्मफेअर अवॉर्ड आणि 10 वेळा नामांकन मिळविले होते. मॉम हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. सदमा, नगीना, नागीण, चालबाज, मिस्टर इंडिया,खुदा गवाह, चांदनी,जुदाईअसे काही त्यांचे गाजलेले चित्रपट होते. अगदी कमी वयात त्यांनी अभिनयाला सुरुवात केली होती.

१९६७ मध्ये बालकलाकार म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. ७८ मध्ये आलेला सोलहवा सावन हा त्यांचा पहिला चित्रपट होता. पण त्या प्रसिद्ध झाल्या ८३ मध्ये आलेल्या हिम्मतवाला चित्रपटातून. हिंदीसोबतच कन्नड, तामिळ,तेलुगू आणि मल्याळम चित्रपटातही त्यांचे योगदान राहिले.२०१२ मध्ये इंग्लिश विंग्लिश चित्रपटातून त्यांनी पुनरागमन केले होते.

भारत, पाकिस्तान, चीनसह जगभरातील माध्यमांनी त्यांच्या निधनाची दखल घेतली असून समाज माध्यमातून विविध मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

LEAVE A REPLY

*