‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ चित्रपटाला संगीत देणार ‘ही’ मराठमोळी जोडी!

0

‘स्पॉटबॉय ई’ या वेबसाइटनुसार ‘यशराज फिल्म्स’ च्या बॅनरअंतर्गत बनणाऱ्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ चित्रपटामध्ये संगीत दिग्दर्शन विभागात फेरबदल करण्यात आले आहे.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार शंकर- एहसान- लॉय यांच्या एक्झिटनंतर ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’मध्ये अजय- अतुल या संगीतकार जोडीला संधी मिळाली आहे.

याविषयी ‘स्पॉयबॉय ई’ला दिलेल्या एका मुलाखतीत एहसान म्हणाला, ‘हो आम्ही त्या प्रोजेक्टचा भाग होतो. पण, स्क्रीप्टमध्ये काही बदल केल्यामुळे परिस्थिती बदलली. वेळेअभावी आम्ही काही गोष्टींची पूर्तता करु शकलो नाही. त्यामुळे आम्ही हा प्रोजेक्ट सोडला’.

शंकर- एहसान- लॉय यांनीच निर्मात्यांना  अजय अतुलचं नाव सुचवलं.

LEAVE A REPLY

*