Type to search

आवर्जून वाचाच हिट-चाट

‘स्त्री’ ची बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई ; १५० कोटींचा गल्‍ला

Share
मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या ‘स्त्री’ सिनेमाची जोरदार चर्चा आहे. बॉक्स ऑफिसवर १५० कोटींचा बिजनेस करणा-या या सिनेमामुळे श्रध्दा कपूर इन्स्टाग्रामवर बॉलीवूडची टॉप ट्रेंडिग अभिनेत्री बनली आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या अनुसार, ‘स्त्री’ श्रध्दा कपूर डिजिटल विश्वात आणि इन्स्टाग्राम दोन्हीवर सध्या सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री आहे.

गेल्या काही दिवसांपासून लोकप्रियतेच्या बाबतीत श्रध्दाने प्रियांकालाही मागे टाकल आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाचे सह संस्थापक अश्वनी कौल म्हणतात, ‘स्त्री चित्रपटाच्या लोकप्रियतेमुळे आणि सिनेमाला प्रेक्षकांच्या मिळत असलेल्या प्रतिसादामुळे श्रध्दा कपूरच्या लोकप्रियतेत बरीच वाढ झालेली दिसून आली आहे. सिनेमा पहिलेल्या प्रेक्षकांची प्रतिक्रिया आणि त्याविषयीच्या होणा-या इन्स्टा पोस्टमुळे श्रध्दा इन्स्टाग्रामवर लोकप्रियतेच्या शिखरावर आहेच. श्रध्दा सध्या डिजीटल आणि इन्स्टाग्राम दोन्हीवर श्रध्दा अग्रेसर आहे.

बॉलिवूडमध्ये काही वर्षांपासून हॉरर कॉमेडी चित्रपट बनवण्याचा ट्रेण्ड निर्माण झाला आहे. काही चित्रपट यात यशस्वी ठरले, तर काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटले. राजकुमार राव व श्रद्धा कपूर यांच्या हॉरर कॉमेडी असलेल्या ‘स्त्री’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!