‘स्त्री’ची प्रेक्षकांवर भुरळ ; १०० कोटींकडे वाटचाल

0
मुंबई : राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘स्त्री’ चित्रपटाला बॉक्स ऑफीसवर आश्चर्यकारकरित्या यश मिळत आहे. अवघ्या नऊ दिवसांत ७२.४१ कोटी रुपयांची कमाई या चित्रपटाने केली. ‘यमला पगला दिवाना फिर से’ आणि ‘स्त्री’ एकाच दिवशी प्रदर्शित झाले. हॉरर कॉमेडी असलेला ‘स्त्री’ बॉक्स ऑफीसवर जेमतेम कमाई करेल असा अंदाज होता. मात्र हे सर्व अंदाज खोटे ठरवत या चित्रपटाने १२ दिवसांत ८२.२९ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. लवकरच हा सिनेमा १०० कोटीच्या क्लबमध्ये सहभागी होईल अशी अपेक्षा समीक्षकांच्या वतीने करण्यात येत आहे.

 

LEAVE A REPLY

*