INSTA VIDEO : श्रीदेवीचे ‘मॉम’ प्रमोशन!

0

रविवारी शिल्पा शेट्टी करण जोहरच्या घरी गेली होती. श्रीदेवी, मनिष मल्होत्रा हेदेखील करणच्या घरी खानपानाला आले होते.

शमीता शेट्टीने हा व्हिडिओ शूट केला आहे.

ज्यात करण त्याच्या घरी आज खास पाहुणे आल्याचं सांगत, शिल्पा, श्रीदेवी आणि मनिषकडे बोट दाखवतो.

यावेळी शिल्पा म्हणाली की, ‘मी आता सगळ्या कलाकारांच्या आईसोबत आहे. तुम्हीही मॉम हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघा.’ यावेळी शिल्पाच्या बाजूला श्रीदेवी बसली होती.

ती म्हणाली की, ‘सध्या करण माझ्यावर पडणाऱ्या प्रकाशाच्या आड येत आहे.’ तिच्या या वक्तव्यामुळे घरात एकच कल्ला झाला. श्रीदेवीने करणची उडवलेली ही खिल्ली पाहून ती सगळ्या कलाकारांची आई का आहे हे पुन्हा एकदा दाखवून दिले, असे शिल्पा म्हणाली.

 

 

LEAVE A REPLY

*