सोनाली बेन्द्रेंच्या निधनाची अफवा सोशलवर व्हायरल

0
मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे सध्या मेटास्टैटिक कॅन्सरशी झुंज देत असून तिच्यावर न्यूयॉर्कमध्ये उपचार सुरु आहेत. शुक्रवारी तिच्या निधनाबदल अफवा पसली होती. ही बातमी सोनालीचा पती गोल्डी बहल याच्यापर्यंत पोहचली आणि त्यानंतर त्याने यावर संताप व्यक्त केला आणि लोकांना ट्विट करत एक आवाहन केले.

सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने करा. सोनालीच्या प्रकृती विषयीच्या अफवा पसरवू नका. तसेच त्यांवर विश्वास ठेवू नका,’ असं आवाहन गोल्डी बहल यांनी ट्विटरवरून केलं आहे. मात्र सोनालीच्या निधनाचं ट्विट करणारे राम कदम यांना एकदा जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. या ट्विट नंतर कदम यांना यूजर्सनी ट्रोल केलं होतं. कदम यांच्यावर टीका करण्यात आली होती. त्यामुळे चूक लक्षात येताच त्यांनी ते ट्विट डिलिट करून दिलगिरी व्यक्त करणारं ट्विट केलं. मात्र अनेकांनी आधीच त्या ट्विटचे स्क्रीनशॉट काढून सोशल मीडियावर फिरवले होते. त्यामुळे गोल्डी बहल भडकले आणि त्यांनी अशा प्रकारची अफवा न पसरवण्याची विनंती यूजर्सना केली आहे.

LEAVE A REPLY

*