‘श्रीदेवी’ ची प्रतिमा आता स्वित्झर्लंडमध्ये

0
मुंबई : केवळ भारतातच नव्हे तर परदेशात देखील श्रीदेवीच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. स्वित्झर्लंड येथील सरकारने श्रीदेवीचे प्रतिमा उभारण्याचे ठरवले आहे. १९८९मध्ये प्रदर्शित झालेला ‘चांदणी’ चित्रपटाचे शुटिंग स्वित्झर्लंड मध्ये करण्यात आले होते. २०१६मध्ये याच चित्रपटाचे दिग्दर्शक यश चोप्रा यांच्या प्रतिमेचे स्वित्झर्लंडमधील इंटरलेकन या ठिकाणी अनावरण करण्यात आले होते.

श्रीदेवीचे प्रतिमा उभारण्याची योजनेच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकारी यांनी सांगितले की, चोप्रा यांच्या ‘चांदणी’ चित्रपटाच्या शुटिंगमुळे स्वित्झर्लंडमध्ये भारतीय पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे. आता स्वित्झर्लंडची अधिक लोकप्रियता वाढवण्यासाठी दिवंगत श्रीदेवी यांच्या प्रतिमेचा प्रस्ताव सरकारपुढे ठेवण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*