दीपिकाला धोबी पछाडत श्रद्धा कपूर नंबर १

0

मुंबई : बॉलिवूड मध्ये आपले आगळेवेगळे स्थान निर्माण करणारी आशिकी गर्ल श्रध्दा कपूर स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या अनुसार इन्स्टाग्रामवर सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रिटी बनलेली आहे. चक्क श्रद्धाने आलिया भट्ट, प्रियांका चोप्रा आणि दीपिका पादुकोण सारख्या अभिनेत्रींना मागे टाकतं इन्स्टाग्रामवर नंबर वन स्थान पटकावले आहे. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया ह्या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे. इंस्टाग्रामवर श्रद्धा १०० गुणांसह सर्वश्रेष्ठ बनली आहे. तर अलिया भट्ट ८५ गुणांसह दुस-या स्थानावर पोहोचली आहे. दीपिका पादुकोण ६८ गुणांमुळे तिस-यास्थानी तर प्रियांका चोप्रा ६६ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. सोनम कपूर अहुजा ५९ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.

स्कोर ट्रेंड्स इंडियाचे सह-संस्थापक अश्वनी कौल म्हणतात कि, “श्रध्दा आपल्या कुटूंबासोबतचे फोटोही पोस्ट करते.ज्यामूळे तिच्या लोकप्रियतेत वाढ होत असते. चार भारतीय भाषांमधील ६००हुन अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून आम्ही डेटा गोळा करतो. विविध अत्याधुनिक एल्गोरिदममूळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते आणि आम्ही बॉलिवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंगपर्यंत पोहोचू शकतो.”

LEAVE A REPLY

*