तब्ब्ल १८ वर्षांनंतर सलमान खान-रवीना टंडन एकत्र दिसणार

0
मुंबई : बॉलिवूडचा ‘दबंग’ सलमान खान सिनेमाबरोबरच रिअल्टी शो मध्ये देखील लोकप्रिय आहे. सध्या सलमान हा चर्चेचा विषय बनला आहे. सलमानच्या चर्चेचा विषय देखील तेवढाच खास आहे. रिॲलिटी शो ‘दस का दम’मध्‍ये सलमान सोबत रवीना टंडन तब्‍बल १८ वर्षांनंतर एकत्र दिसणार आहे.

सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, रवीनाला सेलेब्रिटी गेस्ट म्‍हणून आमंत्रित करण्‍यात आलं आहे. ती या बुधवारी शूटिंग करणार आहे. रवीनाने म्हटले की, ‘मला वाटतं की, आयुष्‍यातल्‍या प्रत्‍येक टप्‍प्‍यावर कुणाचं कुणी ना कुणी मित्र असतातचं. पण, तो लकी असतो, ज्‍याचं त्‍या टप्‍प्‍यावर एकच मित्र असतो. ते एक सुंदर आणि प्रेमळ व्‍यक्‍ती आहेत. ज्‍यांच्‍यावर मी प्रेम करते.’ रवीना टंडन आणि सलमान हे दोघे एकत्र ‘कहीं प्यार न हो जाए’ या चित्रपटात दिसले होते. रवीना टंडनने याआधी सलमानसोबत ‘पत्थर के फूल’, ‘अंदाज अपना अपना’ आणि ‘स्टम्प्ड’ चित्रपटात दिसले होते.

LEAVE A REPLY

*