पद्मावती वाद : चित्रपट न पाहाताच त्यावर भाष्य करणे योग्य नाही : सलमान खान

0

‘पद्मावती’वरुन सुरु असलेला वाद काही थांबण्याचे नाव घेत नाही. 1 डिसेंबर ही चित्रपट प्रदर्शनाची निर्धारित तारीख होती, मात्र देशात कुठेच चित्रपट प्रदर्शित होऊ शकलेला नाही. आता सलमान खान ‘पद्मावती’बद्दल बोलला आहे.

एका मुलाखतीत सलमान म्हणाला, ‘चित्रपटांवरुन वाद घालणे कोणाच्याच फायद्याचे नाही. यामुळे झाले तर सर्वांचे नुकसानच होते. थिएटरच्या बाहेर प्रदर्शन झाले तर थिएटर मालक तोडफोडीच्या भितीने स्क्रिनिंग करत नाही.’

 

सलमान खान पुढे म्हणाला, ‘चित्रपट न पाहाताच त्याबद्दल मत तयार करणे आणि कोणाच्या भावना दुखावणे हे योग्य नाही.’

LEAVE A REPLY

*