मुंबईत सैफ अली खानच्या चित्रपटाचे चित्रीकरण पालिकेने रोखले; साहित्यही जप्त

0

एका खासगी इमारतीमध्ये सैफ अली खान याच्या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते.

जवळच्याच सेंट झेविअर्स मैदानातही चित्रीकरण सुरू होते.  सेंट झेविअर्स मैदान वादाच्या भोवऱ्यात अडकले असतानाच पूर्वपरवानगी न घेताच या मैदानात सुरू असलेले प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान याच्या चित्रपटाचे चित्रीकरण पालिकेने शुक्रवारी रोखले.

त्यासाठी मोठय़ा प्रमाणावर साहित्यही आणण्यात आले होते. मात्र मैदानात चित्रीकरण करण्यासाठी पालिकेची परवानगी घेण्यात आली नव्हती.

त्यामुळे पालिकेच्या एफ-उत्तर विभाग कार्यालयाने मैदानात जाऊन चित्रीकरण रोखले.

तसेच मैदानात ठेवण्यात आलेले साहित्यही जप्त केले, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

चित्रीकरणासाठी आणण्यात आलेले साहित्यही पालिकेने जप्त केले. दंडात्मक कारवाई करून हे साहित्य परत देण्यात येणार असल्याचे पालिका अधिकाऱ्याने सांगितले.

LEAVE A REPLY

*