रणवीर सिंग पोहचला लॉर्ड्सवर

0
मुंबई : भारत आणि यजमान इंग्लंड यांच्यामध्ये लॉर्ड्सवर दुसऱ्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी पावसाने हजेरी लावल्यामुळे क्रिकेटपटूंसोबतच चाहत्यांचीही घोर निराशा झाल्याचे पाहायला मिळाले. पण क्रिकेट आणि बॉलिवूड विश्वातील दोन दिग्गज व्यक्तींची भेट याच पावसाच्या निमित्ताने झाल्याचे पाहायला मिळाले. बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहने भारत- इंग्लंड यांचा सामना पाहण्यासाठी आणि भारताला प्रोत्साहन देण्यासाठी लॉर्ड्सच्या मैदानावर हजेरी लावली होती. पण रणवीरला हा सामना ऐनवेळी आलेल्या पावसामुळे पाहता आला नाही.

रणवीर १९८३ साली भारताने जिंकलेल्या वर्ल्डकपवर आधारीत ‘८३’ या चित्रपटात काम करणार आहे. त्याचीच तयारी करण्यासाठी सध्या रणवीर सध्या लॉर्ड्सवर पोहचल्याची बातमी आहे. रणवीरने आपल्या इन्स्टावर फोटो पोस्ट करत ‘रेन रेन गो अवे’ म्हणत मॅच सुरु होण्याचा धावा केला होता. दरम्यान; रणवीर सिंग आणि कबीर खान यांनी सचिन तेंडुलकरची देखील भेट घेतली आणि त्याच्याबरोबर एक फोटो काढला.

LEAVE A REPLY

*