रणबीरच्या ‘सिम्बा’त अजय आणि अनिलची धमाकेदार एन्ट्री

0
मुंबई : दिग्दर्शक रोहीत शेट्टी आगामी ‘सिम्बा’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येणार आहे. या सिनेमात रणवीर सिंगची मुख्य भूमिका आहे. पण या चित्रपटात रणवीरबरोबरच अजय देवगनही झळकणार असल्याचे रोहितने जाहीर केल्यामुळे चाहत्यांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता सिम्बामध्ये ट्रिपल धमाका होणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंगसोबत अजय देवगन व अनिल कपूरही झळकणार आहे. अनिल कपूरसोबतचा एक फोटोदेखील रणवीरने त्याच्या ट्विटरवर शेअर केला आहे. ‘सिम्बा’ चित्रपटात अनिल कपूरचीही एन्ट्री झाल्याने हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाल करेल यात काही शंका नाही.

रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिम्बा’ चित्रपट ‘टेम्पर’ या दाक्षिणात्य चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी २८ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

LEAVE A REPLY

*