Video : ‘माय नेम इज रागा’ राहुल गांधीवरील बायोपिक लवकरच

0

मुंबई : सध्या बायोपिकचा ट्रेंड असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींपाठोपाठ राहुल गांधींचाही बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या बायोपिकचा ट्रेलर लाँच करण्यात आला. त्यामुळे आता राहुल गांधींचे जीवनही पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

‘माय नेम इज रागा’ असं या चित्रपटाचे नाव असून रुपेश पाल यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलेले आहे. या सिनेमात राहुल गांधींच्या भूमिकेत अश्विनीकुमार आहेत. या चित्रपटाचा टीझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला. गांधी कुटुंबीय विशेषत: राहुल गांधी यांना केंद्रस्थानी ठेवून चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.

इंदीरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या हत्येनंतर राहुल यांच्या आयुष्यात झालेला मोठा बदल ते राजकारणातील त्यांचा प्रवास या चित्रपटातून दाखवण्यात येणार आहे. रुपेश पॉल या चित्रपटाचा दिग्दर्शक असणार आहे. रुपेशनं ‘सेंट ड्रॅक्यूला’, ‘कामासुत्रा’ सारख्या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

काही दिवसांपूर्वी या सिनेमाच्या सेटवरचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यात सिनेमाचे निर्माते संदीप सिंग, दिग्दर्शक उमंग कुमार आणि विवेक ओबेरॉय तिघांनी क्लॅपरबोर्ड हातात पकडला होता.

LEAVE A REPLY

*