आपण जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत ‘पद्मावती’ प्रदर्शित होऊ देणार नाही

भाजपाचे सूरजपाल अम्मू

0
पद्मावती चित्रपटावरुन सुरु असलेला वाद अद्यापही सुरु आहे. हरियाणामधील भाजपाचे प्रमुख मीडिया कोऑर्डिनेटर सूरजपाल अम्मू यांनी आपण जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत फरिदाबाद आणि गु़डगावमध्ये चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही अशी धमकी दिली आहे.

दरम्यान राष्ट्रीय महामार्गाला लागून असणा-या आयनॉक्स ईएफ-3 चित्रपटगृहात पद्मावतीचे पोस्टर्स लावल्यामुळे क्षत्रिय समाजातील काही लोकांनी मॉलमध्ये घुसून तोडफोड केली.

यामुळे काही वेळासाठी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मॉलचे व्यवस्थापक आणि कर्मचा-यांनी परत हे पोस्टर्स न लावण्याचं आश्वासन दिल्यानंतरच, निदर्शन मागे घेण्यात आलं.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर, पोलीस घटनास्थळी पोहोचले आहे.

LEAVE A REPLY

*