पद्मावती वाद : सुप्रीम कोर्टाने पुन्हा याचिका फेटाळली

0

सुप्रीम कोर्टाने पद्मावती चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगितीसाठी दाखल केलेली याचिका मंगळवारी पुन्हा फेटाळून लावली.

याचिकेत चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती लावण्याची मागणी केली होती. दुसरीकडे, पद्मावती चित्रपट ब्रिटनमध्येही रिलीज करण्यावर बंदी लावण्यात येत आहे. येथे शिएटर मालकांनी धमकी दिली आहे की, हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला तर थिएटरला आग लावली जाईल.

मनोहर लाल शर्मा यांनी त्यांच्या याचिकेत म्हटले होते की, चित्रपटातून आक्षेपार्ह दृश्ट हटायला हवी. तसेच संजय लीली भंसाळी यांच्यावर खटला चालवला जावा असेही म्हटले गेले होते. यापूर्वी 10 नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टाने रिलीजवर बंदी लावण्याची याचिका फेटाळून लावली होती. शर्मा यांनी दावा केला आहे की, निर्मात्यांनी कोर्टाला चुकीती माहिती दिली की, गाणे आणि प्रोमो यांनी सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC-सेंसॉर बोर्ड) ने मंजुरी दिली आहे.

सेंसॉर बोर्डाने अद्याप चित्रपटाला सर्टिफिकेट दिलेले नाही. दरम्यान, फिल्ममेकर्सने चित्रपटाची रिलीज डेटही पुढे ढकलली आहे.

LEAVE A REPLY

*