डिसेंबरमध्ये ‘टायगर’ आणि ‘जुमांजी’ मध्ये टक्कर!

0

सलमान आणि कतरिनाचा ‘टायगर जिंदा है’चित्रपट 22 डिसेंबरला रिलीज होणार आहे. तर डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात द रॉकचा ‘जुमांजी : वेलकम टू द जंगल’ चित्रपटही प्रदर्शित होत आहे.

‘टायगर जिंदा है’ 22 डिसेंबरला, तर ‘जुमांजी’ 29 डिसेंबरला रिलीज होणार आहे.

म्हणजेच अगदी आठवड्याभराचा फरक आहे. त्यामुळे दोन्ही सिनेमांमध्ये टक्कर होणार, एवढं निश्चित.

सलमान-कतरिना जोडीच्या ‘टायगर जिंदा है’ सिनेमाची उत्सुकता प्रचंड आहे. सलमानच्या चाहत्यांसाठी मोठी पर्वणी म्हणजे हा सिनेमा आहे. तर दुसरीकडे, रॉकचा ‘जुमांजी’ हा लहान मुलांसाठी पर्वणी ठरणारा सिनेमा आहे.

‘जुमांजी’ हा फॅण्टसी अॅडव्हेंचर सिनेमा असून, 1995 साली या सिनेमाचा पहिला भाग रिलीज झाला होता.

‘जुमांजी : वेलकम टू द जंगल’ हा सिनेमा भारतात इंग्रजी, हिंदी, तामिळ आणि तेलुगू या चार भाषांमध्ये रिलीज होणार आहे.

LEAVE A REPLY

*