#धड़क #DHADAK : ‘सैराट’च्या आॅफिशिअल हिंदी रिमेक ‘धडक’चे पोस्टर रिलीज!

0

बुधवारी जान्हवी  कपूर आणि शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर या दोघांचा डेब्यू सिनेमा ‘धडक’चे पोस्टर रिलीज झाले.

‘धडक’ हा सिनेमा ‘सैराट’ या गाजलेल्या मराठी चित्रपटाचा आॅफिशिअल हिंदी रिमेक आहे.

करण जोहर हा चित्रपटाचा निर्माता आहे. पुढीलवर्षी 6 जुलैला हा चित्रपट रिलीज होणार आहे.

‘धडक’चे पोस्टर रिलीज होण्याच्या काही तासआधी धर्मा प्रॉडक्शनकडून सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला गेला होता. यात करण जोहरने दोन नवे चेहरे लॉन्च करण्याची घोषणा केली होती.

‘धडक’चे शूटींग येत्या 1 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. शूटींग मुंबई आणि उदयपूरमध्ये होणार आहे.

मराठी चित्रपट ‘सैराट’ नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाने अभूतपूर्व यश मिळवत 100 कोटी कमावणारा पहिला मराठी चित्रपट हा मान मिळवला होता.

यानंतर करण जोहरने या चित्रपटाच्या हिंदी रिमेकचे अधिकार खरेदी केलेत. अर्थात हिंदी रिमेकच्या स्क्रिप्ट आणि स्क्रिनप्लेमध्ये काही बदल आपल्याला पाहायला मिळणार आहेत.

हा चित्रपट शशांक खेतान दिग्दर्शित करणार आहे.

LEAVE A REPLY

*