Type to search

बाहुबली’ फेम प्रभासच्या ‘साहो’चे पोस्टर रिलीज

हिट-चाट

बाहुबली’ फेम प्रभासच्या ‘साहो’चे पोस्टर रिलीज

Share

मुंबई : ‘बाहुबली’ या चित्रपटामुळे ख-या अर्थाने नावारुपास आलेला आणि आपल्या दमदार अभिनयाने अनेक तरुणींना घायाळ करणारा दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास लवकरच आपल्या नवीन चित्रपटामधून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

ह्या चित्रपटाचे नाव ‘साहो’ असून नुकताच प्रभासने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ह्या चित्रपटाचा पोस्टर शेअर केला.

प्रभासने सोमवारी म्हणजेच २० मे ला आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन “मी उद्या चाहत्यांना एक सरप्राईज देणार आहे” असे सांगितले होते. त्याच्या पोस्टनुसार त्यांनी आज या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले आहे.

ह्या पोस्टरसोबत ह्या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख देखील समोर आली आहे. १५ ऑगस्ट ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ह्या पोस्टरमधील प्रभास लूक खूपच जबरदस्त असून प्रेक्षकांनी ह्या लूकला पसंतीची पावती दिली आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!