कोल्हापूर : ‘पद्मावती’च्या सेटला आग कुणी लावली? शोध न लागल्याने ‘फाइल बंद’

0

काही महिन्यांपूर्वी कोल्हापूरमधील पन्हाळा परिसरातील मसाई पठारावर ‘पद्ममावती’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी उभारलेल्या सेटला आग लावण्यात आली. या घटनेने कोल्हापूरकरांवर बरेच आरोप झाले. संपूर्ण भारतात कोल्हापूरची बदनामी होऊन येथील चित्रीकरणाच्या व्यवसायावर अनेक प्रश्नचिन्ह उभे केले.

पण नऊ महिन्यानंतर ही आग कुणी लावली? याचा शोध न लागल्याने पोलिस तपासाची फाइल बंद करण्यात आली आहे.

केवळ प्रसिद्धीसाठीच सेटला आग लावल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याच्या पार्श्वभूमीवर सध्या जी आंदोलने सुरू आहेत, त्यालाही आता केवळ प्रसिद्धीसाठी स्टंटच असल्याचे म्हटले जाऊ लागले आहे.

राजस्थानमध्ये ‘पद्ममावती’च्या चित्रीकरणाला विरोध झाल्यानंतर दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी कोल्हापूरमध्ये चित्रीकरणाचा निर्णय घेतला होता. यासाठी मसाई पठारावर भव्य सेट उभारण्यात आला. युद्धाचे काही प्रसंग या पठारावर चित्रीत करण्यात येणार होते. याशिवाय भव्य महाल उभारण्यात आला होता.

पण, नऊ ​महिन्यांपूर्वी म्हणजे 14 मार्च 2017 रोजी रात्री बारा वाजल्यानंतर काही लोकांनी तेथील सेट जाळण्याचा प्रयत्न केला.

पेट्रोल बाँबचा वापर करून आग लावल्याने चित्रीकरणासाठी आणलेले बरेच साहित्य जळाले.

मौल्यवान वस्तू या आगीत खाक झाल्या. घोड्याचा तबेला पेटल्याने मोठे नुकसान झाले. याबाबत पन्हाळा पो​लिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

LEAVE A REPLY

*