Type to search

हिट-चाट

गुरुनाथची चोरी पकडली जाणार?

Share

मुंबई : ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेने अल्पावधीतच रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. सध्या मालिकेत राधिका नवीन अडचणीत सापडली असून ती या प्रसंगातून बाहेर पडणार हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेत राधिकाने शेतकऱ्यांना देण्यासाठी जमविलेल्या मदतनिधी बॅगेतून गायब होते. बॅगेत पैशांऐवजी दगड असतात. त्यामुळे राधिकांवरच शेतकरी पैसे चोरल्याचा आरोप करतात. त्यामुळे राधिका व राधिका मसाले कंपनीचे नाव खराब होते. पैसे कुठे गायब झाले, याचा शोध पोलीस घेत आहेत.

केडीच्या घराची तपासणी होणार हे कळताच गुरु केडीला सावध करतो आणि त्यामुळे चलाखीने शनाया व सुलक्षणा पोलिसांपासून बॅग लावण्यात यशस्वी होतात. पोलिसांचा तपास वेगाने सुरु आहे आणि लवकरच गुरुची चोरी पकडली जाणार आहे.

गुरूच्या डोक्यात चोराला पकडून देण्याचा प्लॅन चालू आहे पण या सगळ्यात गुरुच अडकणार का? त्याची चोरी पकडल्यावर पोलीस त्याला किती मोठी शिक्षा देणार? राधिका त्याला माफ करणार का? हे पाहणं रंजक ठरणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!