INSTA : ‘त्या’ फोटोमुळे दीपिका झाली ट्रोल!

0

‘पद्मावती’चा ट्रेलरच्या यशानिमित्त अभिनेत्री दीपिका पदुकोणने नुकतीच एक पार्टी दिली. या पार्टीत बॉलिवूडच्या अनेक  कलाकारांनी उपस्थिती लावली होती. या पार्टीतले फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या पार्टीमधील दीपिकाच्या एका फोटोमुळे ती आता चांगलीच ट्रोलही झाली आहे.

अरमान जैनने हा फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला. या फोटोमध्ये दीपिका अरमान आणि तिच्या अजून एका मित्रांच्या खांद्यावर हात टाकून उभी आहे. या फोटोत अरमानच्या हातात दारुचा ग्लास असून दीपिका पूर्णपणे नशेत असल्यासारखी वाटत आहे. यावरून आता दीपिकाला सोशल मीडियावर टीकेचा सामना करावा लागत आहे. ती पूर्ण मद्यधुंद अवस्थेत असून फार विचित्र दिसत असल्याचे एका युजरने कमेंटमध्ये म्हटले गेले आहे.

दीपिकाचे मद्यधुंद अवस्थेतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही तिचे मद्यधुंद अवस्थेतले फोटो सोशल मीडियावर शेअर झाले आहेत. सिद्धार्थ मल्होत्रा आणि करण जोहरसोबतचा तिचा मद्यधुंद अवस्थेतला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

About last night! Thank you @deepikapadukone

A post shared by Armaan Jain (@therealarmaanjain) on

LEAVE A REPLY

*