‘टोटल धमाल’ सिनेमात माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर पुन्हा एकत्र झळकणार?

0

माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. पण, गेल्या बऱ्याच काळापासून रुपेरी पडद्यावर ते दोघंही एकत्र आलेले नाहीत. मात्र आता येत्या काळात माधुरी आणि अनिल पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करणार असल्याचे म्हटले जात आहे.

एका इंग्रजी वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार दिग्दर्शक इंद्र कुमारने ‘धमाल’ या चित्रपटाच्या तिसऱ्या भागासाठी माधुरीकडे विचारणा केली आहे.

रोमॅन्टिक कॉमेडी प्रकारच्या या चित्रपटासाठी माधुरीने होकार दिला, तर पुन्हा एकदा अनिल कपूरसोबत तिची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहता येणार आहे.

‘धमाल’, ‘डबल धमाल’नंतर आता ‘टोटल धमाल’ या चित्रपटाची तयारी सुरु करण्यात आली आहे.

‘टोटल धमाल’मध्ये अजय देवगण, रितेश देशमुख, अर्शद वारसी हे कलाकार झळकणार असल्याचंही म्हटलं जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माधुरी आणि अनिल कपूर यांच्यासोबत चित्रपटाविषयी चर्चा सुरु असून, आता ही चर्चा शेवटच्या टप्प्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*