‘हाथी मेरे साथी’च्या रिमेकमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार ‘भल्लालदेव’!

0

एकेकाळी बॉलिवडमध्ये अधिराज्य गाजवणाऱ्या राजेश खन्ना यांच्या ‘हाथी मेरे साथी’ चित्रपटाचा रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या चित्रपटाला त्या काळात प्रचंड लोकप्रियता मिळाली.

‘हाथी मेरे साथी’ या चित्रपटाच्या रिमेकमध्ये ‘बाहुबली’ फेम अभिनेता राणा डग्गुबती मुख्य भूमिका साकारणार असल्याचे समजते आहे.

‘हाथी मेरे साथी’च्या रिमेकमध्ये मुळ कथेत बरेच बदल करण्यात येणार असून, चित्रपटामध्ये वास्तविक घटनांवर अधिक भर दिला जाणार असल्याचे समजते.

तमिळ चित्रपट दिग्दर्शक प्रभू सोलोमन या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच हिंदी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शनाचा श्रीगणेशा करणार आहे. या चित्रपटातून दर्जेदार वीएफएक्सही पाहण्यास मिळणार असून, तीन भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

LEAVE A REPLY

*