चीनमध्ये ‘बजरंगी भाईजान’ ‘या’ नावाने होणार प्रदर्शित!

0

‘बजरंगी भाईजान’ चित्रपटाला दोन वर्षे उलटल्यानंतर आता हा चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित होणार आहे.

पण, तेथे ‘बजरंगी भाईजान’ चित्रपट याच शीर्षकाने प्रदर्शित होणार नसून वेगळ्या नावाने प्रदर्शित होणार आहे.

कबीर खान दिग्दर्शित ‘बजरंगी भाईजान’ चीनमध्ये ‘लिटिल लोलिता मंकी गॉड अंकल’ या शीर्षकाने प्रदर्शित होईल.

मिळालेल्या माहितीनुसार, चीनने 140 मिनिटांच्या रनिंग टाइमने चित्रपटाला हिरवा कंदील दाखवला असून, ‘डाऊबन’ (Douban) वेबसाइटने त्याला 8.6 रेटिंग दिले आहे.

मात्र, अद्याप चित्रपटाच्या प्रदर्शनाची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

LEAVE A REPLY

*