अक्षय कुमारचा ‘गोल्ड’ आता करणार विदेशवारी

0

मुंबई : हॉकी या खेळावर आधारित असलेला आणि नुकताच शंभर कोटी क्ल्बमध्ये समाविष्ट झालेला अक्षय कुमारचा गोल्ड आता विदेशवारी करणार आहे. अक्षयच्या ‘गोल्ड’ चित्रपटाने दिमाखदार एन्ट्री केली असून १५ ऑगस्टचा मुहूर्त साधून प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी दमदार ओपनिंग करत अनेक चित्रपटांचे विक्रम मोडले होते. हा चित्रपट आता आणखी एक नवा विक्रम रचण्याच्या तयारीत आहे.

सौदी अरबमध्येही ‘गोल्ड’ चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला असून आता सौदी अरेबियातही स्वातंत्र्यानंतर मिळवलेल्या पहिल्या ऑलिम्पिक पदकाची कथा दाखवली जाणार आहे. ‘गोल्ड’ हा सौदी अरबमध्ये प्रदर्शित होणारा पहिला भारतीय चित्रपट ठरणार असल्यामुळे ‘गोल्ड’ चित्रपट पुन्हा एक नवा विक्रम स्थापित करणार असल्याची माहिती अक्षय कुमारनेच त्याच्या ट्विटरवर शेअर केली आहे.

भारतीय टीमने १९४८ साली लंडन येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण जिंकून इतिहास निर्माण केला होता. आता अक्षयच्या ‘गोल्ड’नेही नवा इतिहास निर्माण केला आहे.

LEAVE A REPLY

*