‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ मधील अमिरचा ‘फिरंगी’ लूक

0

मुंबई : बहुचर्चित अमीर खान व बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन असलेला ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ येत्या ८ नोव्हेंबर ला प्रदर्शित होत आहे. बिग बजेट असलेल्या या चित्रपटात अनेक समावेश आहे. गेल्या आठवड्यापासून या चित्रपटातील एक एक कलाकारांच्या भूमिकांवरून पडदा उठत आहे.

अमिताभ, फातिमा, कतरिना यांच्या भूमिका स्पष्ट झाल्यानंतर आता आमिरच्या भूमिका कशी असणार याकडे सर्वच लक्ष होत. परंतु आज आमिर खानच्या भूमिकेचं पोस्टर आमिरने ट्विटर अकाऊंट शेअर केले आहे.

आमिर या चित्रपटात ‘फिरंगी’च्या भूमिकेत आहे. आमिरचा हा लूक ‘इतर चित्रपटांपेक्षा हटके आहे. यामध्ये त्याने कमरेला बॉटल लटकवलेल्या स्थितीत दिसत आहे.

‘सच्चाई तो हमारा दुसरा नाम हे और भरोसा हमारा काम’ अशी टॅगलाईन दिलेली आहे. प्रेक्षकांना विचार करायला लावणारा लूक असल्याचे बोलले जात आहे. हा चित्रपट फिलिप टेलरच्या ‘कन्फेशन्स ऑफ अ ठग्स’ या कांदबरीवर आधारलेला आहे. २७ सप्टेंबरला या चित्रपटाचा पहिला ट्रेलर प्रदर्शित होणार आहे.

LEAVE A REPLY

*