‘पटाखा’मध्ये मुन्नी लगावणार ठुमके

0
मुंबई : बॉलिवूडची मुन्नी अर्थात मलायका अरोरा खान लवकरच विशाल भारव्दाज यांच्या पटाखा सिनेमामध्ये आयटम नंबर करताना दिसणार आहे. मलायकाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्टर शेअर केले आहे. पोस्टरमध्ये मलायका खूपच हॉट दिसतेय. हा फोटो शेअर करताना मलायकाने एक पोस्ट देखील लिहिली आहे.

”हॅलो, हॅलो, हॅलो, दोन दिवसांत सगळे म्हणतील.” या गाण्याचे बोल ज्येष्ठ गीतकार गुलजार यांनी लिहिले आहेत तर कोरियॉग्राफी गणेश आचार्यने केली आहे. मलायकाने पहिलं आयटम साँग शाहरुख खानसोबत दिलसे सिनेमात ‘छैंया-छैंया’ केले होते तर दबंगमध्ये ती मुन्नी बदनाम हुई’ गाण्यावर थिरकली होती.

हा एका कॉमेडी-ड्रामा सिनेमा असणार आहे. यात प्रसिद्ध कॉमेडियन सुनील ग्रोव्हर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.सुनील ग्रोव्हर आणि विशाल भारद्वाज पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. येत्या २८ सप्टेंबरला ‘पटाखा’ रिलीज होणार आहे.

LEAVE A REPLY

*