‘कुछ कुछ होता है’ चा सिक्वल बनवणार करण जोहर

0
मुंबई : गेल्या काही वर्षांपूर्वी ‘कुछ कुछ होता है’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमाची आजही प्रेक्षकांच्या मनावर क्रेझ पहायला मिळते आहे. शाहरूख, काजोलची लव्ह केमिस्ट्री आणि राणी मुखर्जीचा खाज अंदाज आपण पहिला आहे. मैत्री आणि प्रेम यांच्यावर आधारित हा सिनेमा आजही आवर्जून पाहिला जातो. कुछ कुछ होता है या सिनेमाच्या चाहत्यांसाठी आता आणखी एक खुशखबरी आहे. निर्माता करण जोहरने सांगितलं आहे की, जर कधीही त्याने कुछ कुछ होता है च्या सिक्वलचा विचार केला. तर तो अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट, जान्हवी कपूरला घेऊन हा सिनेमा बनवणार आहे.

1998 मध्ये ‘कुछ कुछ होता है’ या सिनेमातून करण जोहरने आपल्या दिग्दर्शनाला सुरूवात केली. या सिनेमांत शाहरूख खान, काजोल आणि राणी मुखर्जी कास्ट केलं होतं. करणला या सिनेमाबाबत प्रेक्षकाने विचारलं की, कुछ कुछ होता है या सिनेमाचा रिमेक कधी बनवणार? तेव्हा हा देखील प्रश्न विचारला होता की, यामध्ये कोण कोण कलाकार असणार आहे. तेव्हा करण जोहर म्हणाला की, जर मी पार्ट 2 बनवला तर रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि जान्हवी कपूरला कास्ट करेन.

LEAVE A REPLY

*