कतरिना कैफ सोबत गैरवर्तन

0

मुंबई : बॉलिवूडचा टायगर सलमान खान सध्या द बॅंग टूरसाठी कॅनडात आहे. या टूरवर सलमानसोबत कतरिना कैफ, सोनाक्षी सिन्हा, जॅकलिन फर्नांडीस, मनीष पॉल, गुरु रंधावा यांसारखे स्टार्स देखील आहेत. पण याचदरम्यान सलमान खानच्या काही फॅन्सकडून बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ सोबत गैरवर्तवणूक केल्यासाची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काय आहे प्रकरण ?
कतरिना कैफ आपल्या हॉटेलमधून बाहेर पडून कारकडे जात आहे. सिक्युरीटी गार्डच्या घोळक्यातून कतरिना जात असताना तिथे उभी असलेली महिला जोरात ओरडते, आम्ही तुझ्यासोबत फोटो नाही घेणार… यावर कतरिना म्हणते, तुम्हाला अशाप्रकारे बोलणे शोभत नाही. मी खूप थकली आहे कारण माझा शो खूप वेळ सुरु होता. त्याचबरोबर कतरिना त्यांना शांत राहण्यास सांगते.

LEAVE A REPLY

*