कपिल शर्मा ‘या’ चित्रपटाद्वारे नवी इनिंग

0

मुंबई : आपल्या बहारदार विनोदी शैलीने प्रेक्षकवर्गाला भुरळ घालणारा कॉमेडी किंग कपिल शर्मा काही दिवसांपासून पडद्यावर दिसलेला नाही. सुनील ग्रोव्हरसोबत झालेलया वादानंतर त्यांनी कोणताही कार्यक्रम हाती घेतला नाही. पण आता पावकरच कपिल पुन्हा एकदा नव्या जोमाने परत येतोय. अर्थात टीव्ही शो नाही तर एक चित्रपट घेऊन येतो आहे.

कपिल एका पंजाबी चित्रपटाद्वारे निर्मित क्षेत्रात पाऊल ठेवतोय. ‘सन आॅफ मंजीत सिंह’ या पंजाबी चित्रपटाची तो निर्मिती करतोय. स्वत: कपिलने आपल्या ट्विटर अकाऊंटवर ही माहिती दिली.

त्याने या चित्रपटात फर्स्ट लुक व्हिडिओही शेअर केला. विक्रम ग्रोव्हर दिग्दर्शित हा चित्रपट येत्या १२ आॅक्टोबरला रिलीज होतोय. आता हा पंजाबी चित्रपट कपिलला किती यश मिळवून देतो, ते पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे.

LEAVE A REPLY

*