वाढदिवशी काजोलची चाहत्यांना अनोखी भेट

0
मुंबई : २०१५ला ‘दिलवाले’ या चित्रपटात झळकल्यानंतर काजोल एकाही चित्रपटात दिसली नाही. त्यामुळे काजोलच्या चाहते तिच्या कमबॅकची आतुरतेने वाट पाहत होते. या चाहत्यांची प्रतिक्षा आता संपली असून काजोलच्या नव्या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे. काजोलचा आगामी चित्रपट हेलिकॉप्टर इलाचा ट्रेलर आज तिच्या वाढदिवशी लाँज केला असून या चित्रपटातील काजोलच्या धमाकेदार अभिनयाची सोशल मीडियावर तारिफ होत आहे.

काजोल व अजय देवगणच्या प्रॉडक्शन हाऊसचा हा चित्रपट प्रदीप सरकार यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाची कथा एका गुजराती नाटकावर आधारित आहे, प्रदीप सरकार यांनी एका मुलाखतीत याबद्दल माहिती दिली होती. चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखा अतिशय दमदार आहे. प्रेक्षक हा चित्रपट पडद्यावर पाहतील, तेव्हा यातील प्रत्येक पात्राच्या प्रेमात पडतील, असे ते म्हणाले होते. काजोल अभिनय करत नाही तर तिच्या वाट्याला आलेली भूमिका अगदी कोळून पिते. तिच्यात एक जादू आहे, जी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करते. ईलाच्या रूपातही प्रेक्षकांना ती आवडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता.

या चित्रपटात काजोल ही एका कॉलेजला जाणाऱ्या तरुणाची आई दाखवली आहे. ती सिंगल मदर असून पुढील शिक्षणासाठी ती मुलासोबतच त्याच्या कॉलेजमध्ये अॅडमिशन घेते. त्यानंतर कॉलेजमधील काजोलची मस्ती, त्यामुळे तिच्या मुलात व तिच्यात आलेला दुरावा हे या चित्रपटात दाखविण्यात आले आहे.

 

LEAVE A REPLY

*