‘जिगरथंडा’च्या हिंदी रिमेकमध्ये तमन्नासोबत फरहान अख्तर आणि संजय दत्त दिसणार!

0

2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘जिगरथंडा’ या तामिळ चित्रपटाचा आता हिंदी रिमेक होणार आहे .

अजय देवगण या चित्रपटाला प्रोड्युस करण्याचे काम करणार आहे, तर चित्रपटात तमन्ना भाटीयासोबत अभिनेता फरहान अख्तर आणि संजय दत्त दिसणार आहेत.

या चित्रपटाला निशिकांत कामत दिग्दर्शित करणार आहेत. निशिकांत यांनी अजय देवगणचा सुपरहिट ‘दृश्यम’चे दिग्दर्शन केले आहे.

तमन्ना या चित्रपटाच्या शूटिंगला ‘क्वीन’ रीमेकची शूटिंग पूर्ण केल्यानंतर सुरुवात करणार आहे. ‘जिगरथंडा’च्या स्टोरी लाइनला बॉलिवूड टच देऊन हिंदी भाषिक प्रेक्षकांसमोर सादर केला जाणार आहे. ‘जिगरथंडा’ या चित्रपटाच्या कथेचा सेट मदुरई येथे उभारण्यात आला होता, तर हिंदी रिमेकच्या कथेत याचा सेट महाराष्ट्रात उभारण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

*