जयललितांच्या बायोपिकचे पहिले पोस्टर प्रदर्शित

0

मुंबई : तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित बायोपिक येणार आहे. त्यांचा जीवनप्रवास या बायोपिकच्या माध्यमातून मांडण्यात येणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होत्या. नुकतेच त्यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘द आयर्न लेडी’ या बायोपिकचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.

कलाक्षेत्रात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या जयललिला यांनी राजकारणातही आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. कलाक्षेत्र ते राजकारण या प्रवासात त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घडामोडींवर ‘द आयर्न लेडी’ या बायोपिकद्वारे प्रकाश टाकण्यात येणार आहे.

प्रियदर्शनी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटाचे पोस्टर दाक्षिणात्य चित्रपट निर्माते मुरुगदास यांनी त्यांच्या ट्विटरवर शेअर केले आहे.

LEAVE A REPLY

*