Type to search

आवर्जून वाचाच हिट-चाट

‘स्त्री’ सिनेमा नंतर राजकुमार राव दिसणार ‘दोस्ताना’ मध्ये

Share

मुंबई : प्रियांका चोप्रा, अभिषेक बच्चन, जॉन अब्राहमच्या २०१० मध्ये ‘दोस्ताना’ या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर धूम केली होती. करण जोहर दीर्घकाळापासून या चित्रपटाच्या सीक्वलवर काम करत असून आता या चित्रपटाची तयारीही सुरू झाली आहे. म्हणजेच, ‘दोस्ताना2’ येणार हे नक्की आहे. ‘दोस्ताना’ तरूण मनसुखानी याने दिग्दर्शित केला होता. ‘दोस्ताना2’कॉलिन डी कुन्हा दिग्दर्शित करणार आहे.

सूत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार यावेळी ‘दोस्ताना2’मध्ये एकदम नवी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. यावेळी सिनेमामध्ये अभिनेता राजकुमार राव प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. ‘दोस्ताना2’साठी राजकुमारचे नाव फायनल झाले आहे. अर्थात तो कुठली भूमिका साकारणार, याची घोषणा अद्याप बाकी आहे. राजकुमार रावचा ‘स्त्री’ हा चित्रपट नुकताच रिलीज झाला. या चित्रपटाने बॉक्सआॅफिसव १३० कोटींपेक्षा अधिकचा बिझनेस केला आहे. आता राजकुमारच्या हाती ‘दोस्ताना2’च्या निमित्ताने आणखी एक मोठा सिनेमा लागला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!