अजय देवगणच्या तानाजीमध्ये या अभिनेत्याची एंट्री

0
मुंबई : बॉलीवूड अभिनेता अजय देवगणचा बहुचर्चित चित्रपट तानाजी- द अनसंग वॉरिअरच्या शुटींगला सुरुवात झाली आहे. या सिनेमात एका प्रसिद्ध अभिनेत्याचा चेहरा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हा अभिनेता म्हणजे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता जगपती बाबू आहेत.

गेली २५ वर्षं टॉलिवूडमध्ये लोकप्रिय असलेले जगपती तानाजीच्या निमित्ताने बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. एका योद्ध्याच्या वेशातला त्यांचा एक लूक व्हायरल झाला आहे. पण या चित्रपटात त्यांची नेमकी कोणती भूमिका असणार आहे, ते मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.

LEAVE A REPLY

*