प्रसिद्ध दिग्दर्शक कुंदन शहा यांचे निधन

0

शनिवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने प्रसिद्ध दिग्दर्शक कुंदन शहा यांचे निधन झाले. ते ६९ वर्षांचे होते.

शहा यांच्या मुलीने त्यांच्या निधनाची माहिती दिली.

‘जाने भी दो यारो’ (1983), ‘कभी हा कभी ना’ (1993) या गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले होते. तर टेलिव्हिजनवरील ‘नुक्कड’ (1986) आणि ‘वागले की दुनिया’ (1988) या त्यांनी दिग्दर्शित केलेल्या मालिकाही प्रचंड लोकप्रिय ठरल्या.

2014 साली ‘पी से पीएम तक’ त्यांनी दिग्दर्शित केलेला शेवटचा चित्रपट ठरला.

LEAVE A REPLY

*