दीपिकाला मिळाला दुसरा हॉलीवूडपट

0
मुंबई : बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी दीपिका पदुकोण पुन्हा हॉलीवूडची वारी करणार आहे. तिला दुसरा हॉलीवूड चित्रपट मिळाला असून त्यातही प्रसिद्ध अभिनेता वेन डिजल असणार आहे. ‘ट्रिपल एक्स’ चित्रपटाच्या मालिकेतील चौथ्या चित्रपटातही दीपिकाची वर्णी लागली आहे.

ट्रिपल एक्स चित्रपटाच्या मालिकेतील तिसरा चित्रपट ‘ट्रिपल एक्स : जेण्डर केज’ या द्वारे दीपिकाने हॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. या मालिकेतील चौथ्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून त्यात देखील दीपिका असणार आहे. याबाबत चित्रपटाचे दिग्दर्शक डीजे क्रूस यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली.

 

LEAVE A REPLY

*