अनुष्काला ‘स्मिता पाटील मेमोरियल’ पुरस्कार

0

मुंबई : आपल्या वेगवेगळ्या भूमिकांतून प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी अभिनेत्री अनुष्का शर्माने सिनेसृष्टीत नुकतेच आपली दहा वर्ष पूर्ण केली. अभिनयातून अनेक पैलू तिने मांडले. त्यामुळे नुकत्याच वेगळा धाटणीचा सुई धागा देखील तितकाच लोकप्रिय होत चालला आहे. अभिनयासाठी आजपर्यंत अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. नुकताच तिला ‘स्मिता पाटील मेमोरियल पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. .

मुंबईमधील प्रियदर्शनी अकादमीच्या ३४ व्या वर्षपूर्तीनिमित्त अनुष्काला अभिनय क्षेत्रातील योगदानासाठी ‘स्मिता पाटील मेमोरियल पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार अनुष्काला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पियुष गोयल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

LEAVE A REPLY

*