आमिर खानने लैंगिक अत्याचाराचा आरोप झालेल्या दिग्दर्शकाचा सिनेमा सोडला

0
मुंबई  : #MeToo चं अभियान देशभरात सुरू असताना काही बॉलिवूड कलाकारांनी आपल्‍या विचारांना वाट मोकळी करून दिली आहे. तर ‘मी टू’ या अभियानावर काही राजकीय मंडळी प्रतिक्रिया देत आहेत.  बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने लैंगिक छळाचा आरोप असणाऱ्या दिग्दर्शकासोबत काम करण्यास नकार देत चित्रपट सोडला आहे.

लैंगिक अत्याचाराचा आरोप झालेल्या एका दिग्दर्शकाच्या सिनेमातून आमिर खानने काढता पाय घेतला आहे. आमिर खानने त्याची पत्नी किरण राव आणि स्वतःच्या वतीने एक पत्रक काढून याबाबत माहिती दिली आहे. लैंगिक अत्याचाराचा आरोप असलेला दिग्दर्शक सुभाष कपूर याच्या ‘मुगल’ या आगामी सिनेमात आमिर काम करणार होता पण त्याने आता सिनेमा सोडला आहे.

‘आम्ही ज्या व्यक्तीसोबत सिनेमा करणार होतो त्याच्यावर लैंगिक छळाचे आरोप झाले आहेत असं आम्हाला समजलं. त्याबाबत आम्ही चौकशी केली असता, लैंगिक छळाबाबतचं ते प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची माहिती मिळाली. अद्याप त्या प्रकरणाचा निकाल आलेला नाही, त्यामुळे या सिनेमातून बाजूला होण्याचा निर्णय घेतला.

LEAVE A REPLY

*