लवकरच आलिया- रणबीरच्या लग्नाची बोलणी होणार?

0

मुंबई : करण जोहर, रणबीर कपूर आणि आलिया भट्टची मैत्री बॉलिवूडमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. तिघांनी एकत्र काम देखील केले आहे. तसेच आलिया – रणबीरच्या रिलेशनशिपबद्दल कायम करण काही ना काही बोलत असतो. करण सध्या ‘कॉलिंग करण सिझन 2’ होस्ट करत आहे. अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट येत्या काळात त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा करण्याची चिन्हं आहेत.

दरम्यान; याआधी रणबीरने मुलाखतींमध्ये आपण आलियाला डेट करत असल्याचं कबुल केलं होतं. त्यामागोमागच आलियानेही आपण सिंगल नसल्याचं जाहीर केलं. सध्या त्यांच्या नात्याविषयी चर्चा रंगत आहेत की, रणबीर आणि आलियाचे कुटुंबीय त्यांच्या लग्नाची चर्चा करण्यासाठी भेटणार आहेत. येत्या काही महिन्यांमध्ये बी- टाऊनचं हे क्युट कपल त्यांच्या नात्याला नवं वळण देतं का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

घरच्यांची संमती

आलिया आणि रणबीरच्या घरी त्यांच्या नात्याविषयी सर्व माहिती असून, दोघांच्याही नात्याला घरच्यांची संमती असल्याचं स्पष्ट झालं आहे. काही दिवसांपूर्वीच रणबीरच्या कुटुंबीयांसोबत आलियाला पाहिलंही गेलं होतं. सध्याच्या घडीला ते दोघंही ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र असून चित्रीकरणातून व्यग्र झाल्यानंतरच ते आपल्या खासगी आयुष्याकडे लक्ष देणार असल्याचं कळत आहे.

LEAVE A REPLY

*